Narayan Rane On Uddhav Thackeray Saam Digital
महाराष्ट्र

Narayan Rane On Uddhav Thackeray : वाकड्यात शिरला तर...! PM मोदी, फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane News : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज करण्याची तुमची औकात नसल्याचं म्हटलं आहे.

Sandeep Gawade

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची उद्धव ठाकरेंची औकात नसल्याची घणाघाती टीका माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे तुम्ही वाकड्यात शिरला तर तुम्हाला तशाच तसं उत्तर दिलं जाईल.तुमचं मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होतं. तुमच्या कारकीर्दीत महाराष्ट्र १० वर्षे मागे गेला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणूकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

माननीय नरेंद्रजी मोदींबद्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत असे आपण म्हणालात.

आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो. आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते. काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वःताचे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत.भाजप व आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT