file Photo Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Tiger Worship : सातपुड्याचा जंगलातील आदिवासींची अनोखी प्रथा; बांधव करतात वाघांची पूजा, नेमकं कारण काय?

Nandurbar Tiger Worship :पूर्वी आदिवासी बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे. मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरी आज ही त्यांची पूजा केली जाते

Vishal Gangurde

सागर निकवाडे, धुळे

Satpura Tiger Worship :

नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटात असलेल्या नणंद भावजाईचा घाटात चक्क वाघाची पूजा केली जाते. ही वेगळी पूजा हे ऐकून तुम्हाला आश्चर्य झालं असेल पण हे खरं आहे. वाघाने गावशिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासी बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे. मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरी आज ही त्यांची पूजा केली जाते. (Latest Marathi News)

जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात वाघ देव आणि आदिवासी बांधवांची कुलदैवत देवमोगरा मातेच मंदिर बांधले आहे. दरवर्षी दोन दिवसीय वाघदेव यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होते. या यात्रोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.

निसर्गाचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणाऱ्या वाघाने गावशिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी वाग्देवता पूजन केले जाते.

वाघ देवतेचे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव देवीच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातील देवमोगरा येथे रवाना होतात. वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि महू फुलाची दारू यांचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्यानंतर ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ होत आहे. मात्र, पूजन करून करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधवांचे सुरु आहे. श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील देवबारा येथील मंदिराच्या परिसरात विविध सुविधांची वानवा असल्याने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी आहे.

आदिवासी बांधवांची श्रद्धा असलेल्या वाग्देव मंदिरात दरवर्षी शेकडो भाविक हजेरी लावतात. पारंपरिक सण उत्सवावेळी या ठिकाणी वर्दळ असते. लांबवरून येणाऱ्या भाविकांना अनेकवेळा सुविधा न मिळाल्याने ते घाईघाईने परत जातात. शासनाने येथे सुविधा दिल्यास भाविकांची सोय होवून या परिसराचा विकासही होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : विजय नक्की आमचा होईल- हेमंत रासनेंच्या पत्नी

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT