सागर निकवाडे
नंदुरबार : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात एका ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील चिनोदा गावात घडली आहे. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चिनोदा या गावाच्या परिसरात सदरची घटना घडली आहे. कार्तिक राजेश पाडवी (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. आई- वडिलांसोबत शेतशिवारात चारा कापण्यासाठी गेलेल्या बालकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला (Leopard Attack) केला. बिबट्याने बालकाच्या मानेला पकडत साधारण १०० मीटरअंतरापर्यंत फरफटत नेले. यावेळी जवळ असलेल्या आई- वडिलांनी जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने मुलाला सोडून धूम ठोकली. मात्र बिबट्याने मुलाच्या मानेला पकडल्याने गंभीर जखमी होऊन बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बंदोबस्ताची मागणी
सातपुड्याचा परिसर असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. दरम्यान परिसरात अनेकदा बिबट्या दिसून आला होता. याबाबत (Forest Department) वन विभागाकडे माहिती देखील देण्यात आली होती. मात्र वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हि घटना घडली असल्याचा आरोप करत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता तरी बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.