Shindkheda Accident  Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda Accident : परिवारासोबत होळीचा आनंद ठरला अखेरचा; सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचा अपघातात मृत्यू

Nandurbar News : नंदलाल शिरसाट यांची नुकताच जम्मू येथे बदली झाली होती. याठिकाणी रुजू झाल्यानंतर जवान नुकताच होळीच्या सुट्टीत निमित्ताने गावी आले होते. पत्नी व मुलांसोबत यंदाची हि होळी अखेरची ठरली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान सुटी घेऊन घरी आलेले होते. परिवारासोबत होळी साजरी केली. यानंतर मेव्हणीचा विवाह असल्याने त्यासाठी निघालेल्या जवानावर काळाने घाला घातला. दोंडाईचा- शिंदखेडा रस्त्यावर शिंदखेडा शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात राहणाऱ्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नंदलाल यशवंत शिरसाट (वय ३१) असे मृत जवानाचे नाव आहे. नंदलाल शिरसाट यांची नुकताच जम्मू येथे बदली झाली होती. याठिकाणी रुजू झाल्यानंतर जवान नंदलाल हे नुकताच होळीच्या सुट्टीत निमित्ताने आपल्या गावी आले होते. पत्नी व मुलांसोबत यंदाची हि होळी अखेरची ठरली असून नंदलाल यांच्या अपघाती मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

मेव्हणीच्या हळदीला जाताना अपघात 

दरम्यान लोणखेडा येथील जवान नंदलाल शिरसाठ यांच्या मेव्हणीचा विवाह होता. यामुळे ते लोणखेडा येथून भोरखेडा येथे मेहुणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात होते. याच वेळी शिंदखेडा येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने नंदलाल यांचा जागीच मृत्यू झाला. 

थोड्या दिवसात जाणार होते ड्युटीवर 

होळीच्या सणानिमित्ताने नंदलाल हे काही दिवसांची सुटी घेऊन गावी आले होते. यातच मेव्हणीचा विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते जम्मू येथे ड्युटीवर हजर होणार होते. यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. जवान नंदलाल यांच्या पश्चात ५ वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. दरम्यान नंदलाल शिरसाठ यांचे मोठे बंधू चेतनकुमार शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT