50 Students Suffer Suspected Food Poisoning At Government Hostel In Nandurbar saam tv
महाराष्ट्र

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Food Poisoning in Government Hostel: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात ही घटना घडली. जेवण केल्यानंतर सुमारे १५ मिनिटांत विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवली.

Bharat Jadhav

  • शासकीय वसतिगृहात विषबाधेची घटना घडली.

  • ४० ते ५० विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.

  • शासकीय रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी दाखल

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना जेवण केल्याच्या १५ मिनिटानंतर उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. यातील तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (50 Students Suffer Suspected Food Poisoning At Government Hostel In Nandurbar)

वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती होताच जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी विचारपूस केली. दरम्यान रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची विचारपूस केल्यानंतर जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहादा शहरातील समाज कल्याण वसतीगृह आहे, तेथील ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यातील २५ विद्यार्थी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही पाच मुलांना बीपीचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्या विद्यार्थ्यांचीही विचारपूस केली आहे. पालकांशीही विचारपूस केली.

वसतीगृहात नेमकं काय झालं कळालं नाहीये. परंतु वसतीगृहातील जेवणाचे सॅम्पल आणि उलट्याचे स्पॅमल प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येईल. आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे शनिवार दुपारी डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ली. जेवणाच्या पंधरा मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याचं डॉक्टर सांगत आहेत. .तहसीलदार संभाजी पाटील ,प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहादा पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. या वसतीगृहात ठेकेदार निष्कृष्ट अन्न देत असल्यामुळे या अगोदरही तक्रार केल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

SCROLL FOR NEXT