Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : शहादा शहरात बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक; रात्रीच्या घटनेने प्रवाशी भयभीत

Nandurbar News : नाशिकहून आलेली राज्य परिवहन महामंडळाची बस शहादा शहरात प्रवेश केल्यानंतर शाळेच्या दिशेने येणाऱ्या या बसवर रात्री अज्ञात व्यक्तींकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शिवतीर्थ ते सप्तशृंगी माता मंदिर परिसरात दगडफेक

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
शहादा (नंदुरबार)
: नाशिकहून शहाद्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास अचानक घडलेल्या या प्रकाराने बसमधील प्रवाशी मात्र भयभीत झाले होते. दरम्यान या दगडफेकीत कोणालाही इजा झालेली नाही. 

नाशिकहून आलेली राज्य परिवहन महामंडळाची बस शहादा (Shahada) शहरात प्रवेश केल्यानंतर शाळेच्या दिशेने येणाऱ्या या बसवर रात्री अज्ञात व्यक्तींकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शिवतीर्थ ते सप्तशृंगी माता मंदिर परिसरात दगडफेक झाली आहे. बसवर अचानक दगडफेक झाल्याने बस चालकाच्या प्रसंगावधान बस कुठेही न थांबता सरळ आगारात घेऊन गेले. मात्र या दगडफेकीत (St Bus) बसचे मोठं नुकसान झालं असून घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यां कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  

दरम्यान या घटनेत बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी कोणालाही इजा झाली नाही. मात्र या घटनेमुळे प्रवाशी भयभीत झाले होते. तर घटनेची माहिती (Police) पोलिसांना दिल्यानंतर पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शांतता होती. मात्र ही घटना कशामुळे झाली व दगडफेक कोणी केली याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT