Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी; दरातील फरकावरून शेतकऱ्याला केली मारहाण

Nandurbar News : कापसाचा बाजार भाव ७ हजार ७० रुपये असताना देखील शहादा कापूस खरेदी केंद्रावर ६ हजार ८०० रुपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : कापूस खरेदी केंद्रावर शेतकरी कापूस विक्रीसाठी येत आहेत. परंतु नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा शहरातील कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळत आहेत. येथे बाजारभावापेक्षा कमी दराने (Cotton) कापूस खरेदी केली जात आहे. याबाबत विचारणा केल्याने व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील (Shahada) शहादा येथील कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची मनमानी पद्धतीने कापसाची खरेदी केली जात आहे. बाजारभावापेक्षा २७० रुपये कमीने कापसाची खरेदी केली जात आहे. (Cotton Price) कापसाचा बाजार भाव ७ हजार ७० रुपये असताना देखील शहादा कापूस खरेदी केंद्रावर ६ हजार ८००  रुपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे. या सोबतच कट्टीच्या नावाखाली प्रतिक्विंटल पाच- दहा किलो कापसाची कपात देखील केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारवाईची मागणी 

व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांकडे गेले असता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. एकूणच हे कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT