Shahada Accident Saam tv
महाराष्ट्र

Shahada Accident : कार- मोटरसायकलची समोरासमोर धडक; शहादा प्रकाशा रस्त्यावर अपघात, मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

Nandurbar News : शहादा- प्रकाश रस्त्यावरील शहादा शहराजवळ १३२ केव्ही विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन जवळ मोटरसायकल आणि स्विफ्ट गाडीचा हा भीषण अपघात झाला.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : मोटारसायकल व कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात (Shahada) शहादा- प्रकाशा रस्त्यावर सकाळी घडला असून जखमीला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

शहादा- प्रकाशा रस्त्यावरील शहादा शहराजवळ १३२ केव्ही विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन जवळ मोटरसायकल आणि स्विफ्ट गाडीचा हा भीषण अपघात झाला. सकाळच्या सुमारास रस्त्यावर अधिक रहदारी नसल्याने (Nandurbar) कार व मोटारसायकल दोन्ही वेगाने जात होते. दरम्यान दोन्ही दोघांकडून गाडी कंट्रोल न झाल्याने एकमेकांवर आदळल्या गेल्या. यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला जाऊन यात तो गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी धाव घेत जखमीला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या ठिकाणी वारंवार अपघात होत असून देखील प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकूणच या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहेत. एकीकडे पोलिसांनी परिवहन विभाग रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात रस्ते अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT