Former Shiv Sena (Shinde group) MLA Shirish Chaudhary arrested by Nandurbar police in robbery and atrocity case. saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Shivsena Former MLA Arrested : शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक करण्यात आलीय. नंदुरबार पोलिसांनी दरोडा आणि अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करत ही अटकेची कारवाई केली आहे.

Bharat Jadhav

  • मिरवणुकीत झालेल्या वादा नंतर रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड

  • माजी आमदार चौधरी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली.

  • पोलिसांकडून आता पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आला होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदूरबारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

माजी आमदार चौधरी यांना अटक केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात माजी आमदार चौधरी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे नंदूरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आता पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर शहरात विजय मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीत वाद झाला होता. रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती.या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान विजय मिरवणुकीत झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नंदुरबारमध्ये गुंडशाही सुरू आहे,ती सहन केली जाणार नाही,अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

शिरीष चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीच्या नावाखाली दहशत निर्माण केली. मिरवणुकीत अंगप्रदर्शन करणे, चिथावणीखोर हावभाव करणे आणि भरवस्तीत जाऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तसेच महिलांना जातिवाचक शिवीगाळ करणे, हा प्रकार केल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला होता. माजी आमदार शिरीष चौधरी यांचे कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सत्तेचा माज करत सर्वसामान्यांना धमकवत आहेत. इतकेच नाही तर गुजरातमध्ये बनावट दारू विक्री आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांत हे कुटुंब गुंतलेले असल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT