nandurbar police bans pataka silencer saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: सायलेन्सर बदलणाऱ्या वाहन चालकांवर नंदुरबार पाेलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या कारण

Patakha' Silencers : नंदुरबारामधील नागरिकांकडून पाेलिसांच्या कारवाईची कौतुक केले जात आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

वायु आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्याची माेहिम नंदुरबार पाेलिसांनी हाती घेतली आहे. ही कारवाई नंदुरबार वाहतूक शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आहे. फटाक्याचा आवाज करणारे सायलेन्सर काही वाहनांमध्ये पाेलिसांना आढळले. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. वाहनधारकांनी सायलेन्सरमध्ये बदल करु नयेत असे आवाहन देखील पाेलिसांनी केले आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी केलेल्या आवाहनानूसार ज्या मोटर सायकलला मूळ सायलेन्सर नसून दुसऱ्या कंपनीचे सायलेन्सर आहेत अशा मोटरसायकल चालकांवर कडक कारवाई केली जात आहे. अल्पवयीन मुलांना देखील पालकांनी वाहन चालविण्यास देऊ नये. अन्यथा पालकांवर देखील कारवाई हाेऊ शकते.

नंदुरबार वाहतूक शाखेची पाेलिस नियमबाह्य वाहनांवर आणि नियम ताेडणा-या वाहन चालकांवर कारवाई करीत असल्याने पाेलिस दलाच्या महसूलात मोठ्या प्रमाणात वाढ हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक गाड्यांना चुकीच्या पद्धतीचे सायलेंसर बसविण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामध्ये नागरिकांकडून या कारवाईची कौतुक देखील केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT