नंदुरबार : भाजपाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन SaamTvNews
महाराष्ट्र

नंदुरबार : भाजपाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गरिबांना अन्नदान वाटप करून स्थापनादिन साजरा

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे भाजपाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त (BJP Foundation Day) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार (Nandurbar) येथील भाजपाच्या विजयपर्व जिल्हा कार्यालयावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते भाजपच्या पक्षीय ध्वजारोहन करण्यात आले तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या व्हर्च्युअल सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापना दिनानिमित्त केलेलं मार्गदर्शन उपस्थित कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले.

हे देखील पहा :

यानंतर शहरातील अमृत चौक परिसरात गरीब जनतेस अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा (BJP) जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्याहस्ते अन्नदान वाटप करण्यात आले. दरम्यान भाजपाचे महिला युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी, नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक, नंदुरबार जिल्हा भाजपाचे पदाधिकारी, भाजपच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT