Shahada Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Shahada Water Shortage : शहाद्यात आठ दिवसानंतर पाणी तेही दूषित; हंडा मोर्चा काढण्याचा महिलांचा इशारा

Nandurbar News : शहादा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या तलाठी कॉलनी आणि मलोनी परिसरात वृद्ध महिलांना पाण्यासाठी धावपळ करताना पाहायला मिळत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : पावसाळा सुरू झाला असला तरी अद्यापही अनेक भागांमध्ये पाऊस झालेला नाही. परिणामी नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र असतानाच शहरी भागात देखील पाण्याच्या समस्या आहे. आजही सात ते आठ दिवसांनी पाणी पुरवठा होत असून तो देखील दूषित होत असल्याने महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या तलाठी कॉलनी आणि मलोनी परिसरात वृद्ध महिलांना पाण्यासाठी धावपळ करताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पुरवठा हा गेल्या तीन महिन्यांपासून आठ ते दहा दिवसांआड होत आहे. (Water Scarcity) यामुळे महिलांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून या भागातील रहिवाशांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. हि समस्या आज देखील कायम आहे. 

आंदोलन छेडण्याचा दिला इशारा 

आठ दिवसानंतर नळाला पाणी आल्यानंतर देखील ते पाणी शुद्ध नसल्याने नळाद्वारे गढूळ पाण्याच्या पुरवठा केला जात आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने महिला आता चांगलेच आक्रमक झाले असून पाण्याच्या समस्याचे लवकर सोडवल्या नाहीत, तर लहान बालकांना सोबत घेऊन नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढत (Shahada) नगरपालिकेचा कार्यालयात बसून आम्ही आंदोलन करणार असल्याच्या इशारा आता महिलांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळा येथील लक्ष्मी नारायण मंदिराच जिर्णोद्धार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT