Nandurbar water Crisis Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar water Crisis : गाढवावर लादून आणल जातेय २०० फूट खोल दरीतून पाणी; सातपुड्याच्या दुर्गम भागात जल संकट

Nandurbar News : रस्ता नसल्याने या आदिवासी गावकऱ्यांना गाढवाची मदत घेत २०० मीटर खोल दरीत असलेल्या नदीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे. गाढवासोबत जाऊन आदिवासी बांधवांना दररोज ५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील दुर्गम भागात आतापासून जलसंकट निर्माण झाले आहे. अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डोंगराळ भागाच्या खोल दऱ्यांमधून हे पाणी आणावे लागत आहेत. यातच पाणी संकट अधिक गडद होत चालले असून २०० फूट खोल दऱ्यांमधून पाणी आणण्यासाठी गाढवावर पाणी आणावे लागत असल्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या केलापानी गावात आजही रस्ते नाही. परिणामी इथल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रस्ता नसल्याने या आदिवासी गावकऱ्यांना गाढवाची मदत घेत २०० मीटर खोल दरीत असलेल्या नदीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे. गाढवासोबत जाऊन या आदिवासी बांधवांना दररोज ५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. 

रस्ता मंजूर तरीही काम नाही 

जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असल्याने तोरणमाळ नजीकच्या केलापाणी या गावाला रस्ता मंजुर असून तयार न झाल्याने या गावकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रस्ता नसल्याने या आदिवासी बांधवांना वर्षभर पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यात आता पाणी समस्या जाणवू लागल्याने खडतर रस्त्यातून पाणी आणावे लागत आहे. 

पाणी संकट अधिक गडद होणार 

नंदुरबार जिल्ह्यातीळ तोरणमाळ परिसरात मागील पंधरा दिवसांपासून पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. खोर दऱ्यांमधून पायपीट करत नागरिकांना येथून पाणी आणावे लागत आहे. आता उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून आगामी काळात पाण्याची समस्या अधिक गडद होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना भर उन्हात पायपीट करत पाणी आणावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

Maharashtra News Live Update: सैराट फेम आरबाज शेख याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत 1 लाख रुपयाचा चेक देऊन करण्यात आली मदत

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

SCROLL FOR NEXT