Nandurbar Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Water Crisis : नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता वाढली; निम्म्या लघु प्रकल्पांनी गाठला तळ, केवळ २९ टक्के पाणीसाठा

Nandurbar News: वाढत्या उष्णतेबरोबर धरणातील पाणी साठ्यातील बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली असून ग्रामीण भागासाठी संजीवनी असलेल्या लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झालेली पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरातच पाणी टंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. आता हि भीषणता अधिक तीव्र होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कारण जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने ग्रामीण भागात मे महिन्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची संभावना आहे. जिल्ह्यातील १३ पैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेबरोबर धरणातील पाणी साठ्यातील बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली असून ग्रामीण भागासाठी संजीवनी असलेल्या लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झालेली पाहण्यास मिळत आहे. मुळात नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईची समस्या मागील दीड महिन्यांपासून जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करत जावे लागत आहे. तर हे चित्र आणखी गडद होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

आता केवळ २९ टक्के पाणीसाठा 

दरम्यान जिल्ह्यात तापमान ४३ ते ४४ अंशाच्या वर जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ लघु प्रकल्पांपैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून लघु प्रकल्पांमध्ये २८.९८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.  

तीन प्रकल्प कोरडे  

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला तीन प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यात इच्छागव्हा, घोटणेको प.ब. आणि ढोंग या प्रकल्पत शून्य टक्के पाणी आहे. तर उर्वरित मेंदीपाडा २०.२५ टक्के, देवळीपाडा ३८.३०, रकानाला ३९.३६, अमरावतीनाला १३.०६, चौपाळे ५७.५४, सुरी ११.२०, नेसु ४८.२१, चिरडा ५३.०६, धनपूर ५६.५८, भरूवेल ४१.७१ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे; असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT