सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचाच परिणाम आता पाणी पातळीवर देखील पाहायला मिळतोय. जिल्ह्याततील दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धडगाव तालुक्यातील कुकलट या आदिवासी क्षेत्रातील गावाला आता भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. (Live Marathi News)
नंदुरबार जिल्ह्यापासून साधारण १४५ किलोमीटर लांब अतिदुर्गम भागातील कुकलट हे गाव. या गावात जायला व्यवस्थित रस्ते नाही, तर वीज सुद्धा या ठिकाणी २० मिनिटाहुन अधिक काळ टिकत नाही. साधारण एकूण १ हजार २५० लोकसंख्येचे हे गाव असून या गावात १८ हून अधिक हातपंप बसवण्यात आले होते. मात्र या हातपंपापैकी सद्यस्थितीला फक्त एकच हातपंप सुरू आहे. परस परिसरातील सर्वच हातपंप बंद झाल्याने तीन ते चार किलोमीटर पायपीट करत आदिवासी महिलांना पाणी भरावे लागत आहे. कोकलत या गावात तीनहून अधिक विहिरी आहेत. मात्र त्यांनीही आता तळ गाठली आहे. त्यातील एक विहीरहीत पाणी असलं तरी ते पिणे योग्य नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरींची आणि सोबतच लहान नद्यांची खोलीकरण सोबतच गाळ न काढल्यामुळे या गावकऱ्यांना आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी कुठल्या गावात जलसंधारणाचे कामे करण्यात आली असून डोंगराचा उतरत्या भागात आणि शेत शिवारात चाऱ्या खोदून पाणी अडवण्यात आला होता याचाच फायदा गावकऱ्यांना झाला असून मागच्या वर्षी त्यांना पाण्याची सोय झाली होती मात्र त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या जलसंधारणाची कामे न केल्यामुळे पाणी न अडवल्यामुळे आमच्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं उकलट ते माजी सरपंच सांगतात. यावर्षी आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय पिण्यासाठी एकच हातपंप उपलब्ध असून विहिरीही आटले आहेत. यातच तीन चार किलोमीटर प्रवास करत पाणी आणावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुकलट या गावकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी जलसंधारणाचे काम करत डोंगराळ भागात चाऱ्या खोदल्या होत्या. त्यामुळे पावसाचं पाणी आटल्याने त्यांना मागील वर्षी पाणीटंचाई भासली नाही. मात्र आता या गावकऱ्यांना या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कुकलट सारख्या इतर अनेक गावात जर जलसंधारणाची कामे करण्यात आली, तर येणारा काळात नक्कीच कुठल्याही गावात पाणीटंचाई राहणार नाही. प्रशासनानं या जलसंकटाकडे लक्ष देऊन पाणी उपलब्ध करून देण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.