नंदुरबार :- भगवान शिवशंकर यांच्या मंदिरात असलेला नंदी दूध व पाणी पीत असल्याबाबतच्या घटनेचे व्हिडीओ व्हॉटसअप व फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या मध्यमातून झळकत होते. यामुळे सर्वच शिव मंदिरात महिला वर्गाने गर्दी केली होती. पण यामागचे सत्य काय हे जाणून घेवूया. (Nandurbar news Viral satya nandi Water is taken due to surface tension)
नंदुरबार जिल्ह्यासह खानदेशातील विविध भागात नंदी दूध व पाणी पीत असल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. भाविकांची भगवान शंकराच्या मंदिरात नंदिस दूध व पाणी पाजण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळत होते. भगवान शिवशंकर यांच्या मंदिरात असलेला नंदी दूध व पाणी पीत असल्याबाबतच्या घटनेचे व्हिडीओ व्हॉटसअप व फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या मध्यमातून झळकत होते. याबाबतची दखल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनायक सावळे यांनी घेतली व नंदीची मूर्ती दूध किंवा पाणी पिण्यामागील चमत्काराचे शास्त्रीय विश्लेषण समजून सांगितले. तसेच भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना, चमत्काराला भाविकांनी बळी पडू नये; असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनायक सावळे यांनी केले आहे.
हे आहे सत्य वाचा
कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही; हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्टीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणूचा असलेला पृष्टीय थर हा दुसरा त्याच गुणधर्माचा थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो. मूर्ती स्वतः पाणी खेचत असते, ती एका थेंबाच्या रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा ज्या वेळेस त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो. त्यावेळेस ते पाणी खेचले जाते. याला विज्ञानाच्या भाषेत सरफेस टेन्शन किंवा पृष्टीय ताण असे म्हटले जाते. यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.