महाराष्ट्र

नंदुरबार : अवकाळी पावसाचा जोर वाढला; पिकांचे नुकसान, गारठा वाढला

नंदुरबार : अवकाळी पावसाचा जोर वाढला; पिकांचे नुकसान, गारठा वाढला

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. यात रात्री पावसाचा जोर वाढल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर पावसामुळे थंडीत देखील वाढ झाली आहे.

मिरची, कापसाचे नुकसान

वातावरणातील बदलानुसार आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहण्याची शक्यता दिसत असल्याने काढणीला आलेल्या कापूस, मिरची तसेच पपई, केळी, भात, ओवा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कृउबात खरेदी बंद

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन दिवसापूर्वीच मिरचीसह इतर कडधान्यांची खरेदी बंद ठेवून शेतकरी, व्यापाऱ्यांना अलर्ट केले होते. मात्र पथारीवर सुकवण्यासाठी टाकलेल्या ओल्या लाल मिरचीची अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात व्यापार्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi : नागपुरात येऊन राहुल गांधींचं आरएसएसला आव्हान, संविधान सन्मान संमेलनात हल्लाबोल, काय म्हणाले?

Stroke: चेहरा तिरकस होणं, तोल जाणं...; स्ट्रोकची लक्षणं तुम्हाला माहितीये का? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

Buldhana News : पोलिसांकडून ४ लाखाची रक्कम जप्त; आडत्यांकडून खरेदी विक्री बंद, शेतकऱ्यांचा महामार्गावर चक्का जाम

Maharashtra News Live Updates : सोन्याचे भाव जसे वाढतात, तसे भविष्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार - छगन भुजबळ

IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT