Nandurbar Police Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सोने मिश्रित माती चोरीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीकडून १० लाखांच्या मुद्देमाल जप्त

सोने मिश्रित माती चोरीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीकडून १० लाखांच्या मुद्देमाल जप्त

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार शहरातील सराफा बाजारातील कारागिरांच्या दुकानातून साडेतीन ते चार लाख रुपये किंमतीची (Gold) सोने मिश्रित माती चोरून नेणाऱ्या चौघांना (Nandurbar) नंदुरबार एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. (Maharashtra News)

नंदुरबारमधील सराफा बाजारात अनेक कारागिर काम करत असतात. सराफा बाजारातील दुकानांमधून सोने मिश्रीत मातीची चोरी झाली होती. याचा तपास करत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींनी महाराष्ट्र व इतर कोणत्या राज्यात अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का? याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.

चोरी केलेली सोने मिश्रित माती, कार व मोबाईल असा एकूण १० लाख ३९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस पथकाने ४ लाख रुपये किमतीची ८.३८८ किलोग्रॅम सोने मिश्रित माती, ३१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल, ८ हजार २०० रुपये रोख, ६ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची एक कार असा एकूण १० लाख ३९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT