Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : धनगर आरक्षणाला विरोध; नंदुरबारमध्ये आदिवासी समाज आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्रानी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आलं

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने आंदोलन उभारले होते. धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर काढण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे सांगितले आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी एकवटले असून धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. 

धनगर समाजाने आरक्षणासाठी (Dhanagar Reservation) केलेल्या आंदोलनानंतर धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यासंदर्भात आदेश काढण्याबाबत सरकारकडून करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर नंदुरबारमध्ये समस्त आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. (Nandurbar News) नंदुरबार जिल्ह्यातील अक्रानी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आलं असून सरकार मणिपूरसारखं जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करत असल्याचा आरोप आंदोलकांचा वतीने करण्यात आला.  

तर रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलनाचा इशारा 

या सोबतच धनगरांची घुसखोरी कदापिही सहन केली जाणार नसून आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून महाराष्ट्रभर निदर्शन करणार असल्याचा इशारा आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे. ठिय्या आंदोलनात उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT