Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: चक्रीवादळाचा कहर; धावत्या गाडीवर पडले झाड, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

चक्रीवादळाचा कहर; धावत्या गाडीवर पडले झाड, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह चक्रीवादळात मोठ्या (Nandurbar News) प्रमाणात नुकसान झाले. या दरम्‍यान तालुक्यातील (Taloda) तळोदा– चिनोदा रस्त्यावर धावत्या गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. (Live Marathi News)

राजेंद्र मराठे हे इतर दोन जणांसोबत कारमध्‍ये तळोद्याकडून चिनोदा गावाकडे जात होते. या दरम्‍यान जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळाला सुरवात झाली. या वादळात देखील राजेंद्र मराठे यांची गाडी रस्‍त्‍याने धावत होती. याच दरम्‍यान धावत्‍या गाडीवर अचानक झाड कोसळल्याने राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरे दोन जण जखमी झाले आहेत.

नागरीकांची मदतीसाठी धाव

गाडीवर झाड पडल्याची घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र झाड मोठे असल्याने जेसीबीच्या साह्याने झाडाला बाजू करण्याचे प्रयत्न सुरू आहे. एकूण जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांवरील जीर्ण झाडांचा प्रश्न या घटनेतून समोर येत आहे. तळोदा तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे (cyclone) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

म्यानमार-थायलंड सीमेवर 800 भारतीय ओलीस, नोकरीचं आमिष, 25 मराठी तरुण छळछावणीत

विलास घुले हत्येत बलात्काराचा ट्विस्ट, महिलेचा घुलेच्या मित्रावर ब्लॅकमेलिंगचा आरोप

जळगाव हादरलं! जंगलात नेत 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; अत्याचार करताना बनवला व्हिडिओ

Mumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा; अंतर, स्टेशन संख्या, Route काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती

केतनच्या हत्येसाठी सियानं केला बनाव, हत्येआधी सिया आणि चेतनची लोहग़डावर रेकी

SCROLL FOR NEXT