Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : गुजरातहून अवैद्य गुटख्याची वाहतूक; नंदुरबार पोलीसांकडून १९ लाखांचा गुटखा जप्त

Nandurbar News : गुजरातहून अवैद्य गुटख्याची वाहतूक; नंदुरबार पोलीसांकडून १९ लाखांचा गुटखा जप्त

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या नवापूर (Navapur) तालुक्यातील सोनखांब गावाजवळ गस्त घालत असताना पोलिसांना संशयितरित्या वाहन आढळून आला. यात (Nandurbar) अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत १९ लाख ५ हजार रुपयांचा अवैद्य गुटखा जप्त करण्यात आला. (Latest Marathi News)

गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक नवापूरहुन धुळेच्या दिशेने जात होता. यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीस्तव वाहतूक करताना मिळून आला. संबंधित वाहनास (Police) सोनखांब गावाच्या शिवारात शेरे पंजाब हॉटेलनजीक अडवले असता पोलीसांनी त्याची विचारपूस केल्यावर उडवा उडीचे उत्तरे दिले. 

पोलिसांना संशयास्पद वाटल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही वन तंबाखू असे एकत्रित साठा १७ हजार सहाशे पाकिटे त्यांची एकूण किंमत १९ लाख पाच हजार दोनशे रुपये तर वाहनाची किंमत १३ लाख रुपये असे एकूण ३२ लाख पाच हजार दोनशे रुपये मुद्देमाल हस्तगत केला. अन्न व औषध प्रशासन विभाग नंदुरबारचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक भटू चौधरी याच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digital Eye Strain: डोळे जळजळणं किंवा खाज येणं याला थकवा समजू नका; या गंभीर समस्यांचा असू शकतो इशारा

रुपाली चाकणकर यांना ईडीकडून समन्स? राजकीय वर्तुळात खळबळ, VIDEO

Cricket Ball Weight: तुम्हाला माहितीये का क्रिकेट बॉलचं वजन काय असतं?

LIC Pension Scheme: तुम्हालाही महिन्याला १० हजारांची पेन्शन मिळणार, LIC ची जबरदस्त योजना, फक्त एकदाच गुंतवा इतके पैसे

5 Silent Signs Of Kidney Damage : सकाळी शरीरात दिसणाऱ्या या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, किडनी होऊ शकते फेल

SCROLL FOR NEXT