State Excise Department 
महाराष्ट्र

विदेशी मद्याची वाहतुक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

विदेशी मद्याची वाहतुक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

दिनू गावित

नंदुरबार : परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक केली जात होती. या विदेशी मद्याची वाहतुक करणाऱ्या कंटेनरसह ६२ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. (nandurbar-news-Transportation-of-foreign-liquor-Action-of-State-Excise-Department)

गुजरात (Gujrat) राज्यात दारूबंदी असल्याने देशाच्या इतर राज्यातून गुजरातकडे अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. नंदुरबार (Nandurbar) येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रकाशा ते अक्कलकुवा दरम्यान बुऱ्हानपूर– अंकलेश्वर रस्त्यावर एका कंटेनरवर कारवाई केली आहे.

४८८ मद्याचे बॉक्‍स

सदर कंटेनरमध्ये हरियाणा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी परवाना असलेले विदेशी मद्याचे ४८८ बॉक्स किंमत ४४ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा मद्य साठा बॉडी पॅक कंटेनरमधून अवैधरीत्या वाहतूक होत असताना कारवाई केली. यात एकूण ६२ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालक मनोजकुमार मखनलाल बिश्नोई या इसमास अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार पोलीस निरीक्षक डी. एम. चकोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जे. मेहता, हंसराज चौधरी, हेमंत डी. पाटील, हितेश जेठे, अविनाश पाटील यांच्या पथकाने केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी. एम. चकोर व पथक करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT