Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: मुरमुऱ्यांच्या पोत्याखाली लपवून दारूची वाहतूक; २८ लाखांच्या अवैध दारू जप्‍त

मुरमुऱ्यांच्या पोत्याखाली लपवून दारूची वाहतूक; २८ लाखांच्या अवैध दारू जप्‍त

दिनू गावित

नंदुरबार : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) सीमा तपासणी नाक्यावर २८ लाख ४० हजार रुपये किंमतीची अवैध दारू एलसीबीने (LCB) जप्त केली. मुरमुऱ्यांच्या पोत्याखाली लपवून दारूची वाहतूक केली जात होती. वाहनासह एकूण ३८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक फरार झाला. (Letest Marathi News)

मर्यादेपेक्षा जास्त भार असलेला ट्रक आला असता पथकासह (Maharashtra Gujrat Border) सीमा तपासणी नाक्यावरील पथकाने त्या वाहनास थांबवून वाहन चालकाला वाहनात काय भरले आहे? व वाहनाचे कागदपत्रांबाबत विचारले. यानंतर चालक तेथून पसार झाला. मात्र तपासणी नाक्यावर असलेले सुरक्षारक्षक आणि स्थानिक गुन्हेने (Nandurbar News) विषम विभागाचे पथक असताना देखील चालक फरार कसा झाला आहे; संशोधनाचा विषय असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.

अवैध दारू, ट्रक व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, जितेंद्र अहिरराव, अविनाश चव्हाण, किरण मोरे, तुषार पाडवी यांच्या पथकाने केली.

असा आहे मुद्देमाल

वाहनाची तपासणी केली असता त्यात ८ लाख २८ हजार रुपये किंमतीची बिअर, २० लाख १६ हजार रुपयांची व्हिस्की, २६ हजार ४०० रुपयांचे मुरमुरे व १० लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ३८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT