Navapur Toll Plaza Saam tv
महाराष्ट्र

Navapur Toll Plaza : नाक्यावर टॅक्स बुडवून तीन टँकर चोर मार्गाने मार्गस्थ; नवापूर पोलिसांनी पकडले ओव्हरलोड टँकर

Nandurbar News : नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पहिल्यांदा कारवाई केली नसून याआधी अनेक कारवाया केल्या आहेत.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर शहरालगत धुळ्याहून गुजरात राज्यात जाणाऱ्या तीन ओव्हरलोड टँकर महामार्गाने न जाता (Nandurbar) मधल्या मार्गाने कच्चा रस्त्याने रेल्वे पुलाखालून टॅक्स चुकून जात होते. या ट्रकला नवापूर पोलिसांनी (Police) पकडले असून त्यांना नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील मोटर परिवहन निरीक्षक यांच्याकडे सुपूर्द केले आहे. (Latest Marathi News)

नवापूर (Navapur) पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पहिल्यांदा कारवाई केली नसून याआधी अनेक कारवाया केल्या आहेत. साधारणतः तीन महिन्याच्या कालावधीमध्ये परिवहन विभागाला (RTO) टॅक्स चुकून जाणाऱ्या वाहनांकडून पाच ते सहा लाखांचा महसूल गोळा करून दिला. (Navapur Toll Plaza) नवापूर सीमा तपासणी नाक्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या टॅक्स चुकूनवून ओव्हरलोड गाड्या पास केल्या जातात. याकडे परिवहन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. परिणामी शासनाचा तिजोरीवर याचा फटका बसत आहे. दरम्यान तीन ट्रॅकर पकडले असून त्यांना दंड करण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आड मार्गाने मोठ्या संख्येने वाहने मार्गस्थ होत असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. रेल्वे पुलाखालून कच्च्या मार्गाने टॅक्स बुडवून अनेक वाहन मार्गस्थ होतात. चोर मार्गाने वाहने मार्गस्थ होऊ नये; म्हणून कुठलेही उपाययोजना परिवहन विभागाने केलेली दिसून येत नाही. पोलीस प्रशासनाने अनेक वेळा जेसीबीच्या साह्याने खड्डा करून या ठिकाणी वाहन मार्गस्थ होऊ नये; यासाठी उपाययोजना केल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या महिन्यात धावणार, बुलेट ट्रेनवरही रेल्वे मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

Vivah Muhurat 2026 Date: सनई चौघडे वाजणार! २०२६ मध्ये लग्नासाठी ५९ शुभ मुहूर्त, आताच तारखा बघून घ्या...

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

SCROLL FOR NEXT