नंदुरबार : नवापूर शहरात चड्डी बनियान टोळीचा धुमाकूळ सुरू झाला आहे. २३ जुलैच्या मध्यरात्री चार चोरटे नवापूर शहरातील घाचीवाडी अल सिफा हॉस्पिटल नजीक चोरी करत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. (Nandurbar News Home Robbery)
चड्डी बनियान गँगने चोरीच्या इराद्याने (Navapur) नवापूर शहरातील घाचीवाड्यात प्रवेश केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. अल शिफा हॉस्पिटल परिसरामध्ये रात्री एक वाजेच्या दरम्यान चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरटे घरात शिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाल्याने नवापूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नवापूर (Police) पोलीस अधिक तपास करीत आहे.
कुत्रे भुंकले व नागरिकांच्या सतर्कतेनं घरफोडी टळली
चोरट्यांची टोळी चोरी करण्यासाठी घरात शिरले. मात्र यावेळी कुत्रे जोरात भुंकू लागले. यात कुत्र्याच्या व नागरिकांच्या सतर्कतेने नवापुर शहरातील मोठी घरफोडी टळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.