Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे ठाकरे गट आक्रमक; नंदुरबारमध्ये बेमुदत उपोषण

Nandurbar News : नंदुरबारच्या तहसीलदार नितीन गर्गे हे मनमानी पद्धतीने कारभार करत असतात. त्यांच्यामुळे तहसील कार्यालयातून मिळणारे अनेक दाखले महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबारचे तहसीलदार नितीन गर्गे हे मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तहसीलदार यांची तात्काळ बदली व्हावी; यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. याबाबत निवेदन देखील देण्यात येणार आहे. 

नंदुरबारच्या (Nandurbar) तहसीलदार नितीन गर्गे हे मनमानी पद्धतीने कारभार करत असतात. त्यांच्यामुळे तहसील कार्यालयातून मिळणारे अनेक दाखले महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत. तर अनेक योजना देखील लाभार्थ्यांना मिळत नाही. तहसीलदार गर्गे हे वेळेवर उपलब्ध राहत नसल्याने कुठल्याच दाखल्यांवर स्वाक्षरी होत नाही आहे. यामुळे लाभार्थीना हे दाखले वेळेत मिळू शकत नसल्याचा आरोप (Shivsena) शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आला आहे. या कारणाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे.  

या मनमानी कारभारामुळे तहसीलदाराची तात्काळ बदली करण्यात यावी; या मागणीसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तसेच जोपर्यंत तहसीलदाराची बदली होत नाही, तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याची भूमिका ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT