Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: पंढरपूरमध्‍ये डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजुरांची अखेर सुटका; मजुर धडगावकडे रवाना

पंढरपूरमध्‍ये डांबून ठेवलेल्या ऊसतोड मजुरांची अखेर सुटका; मजुर धडगावकडे रवाना

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भामणा येथील रहिवासी असलेल्या २० उसतोड कामगारांची तीन तुकडी पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील पिराची कुरवाली येथे डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. तेथून सुटका व्हावी यासाठी मजूर विनंती करत असल्याचा व्‍हीडिओ हाती (Nandurbar News) आला होता. आदिवासी हितासाठी काम करणारी आदिवासी जनजागृती टीम त्यांच्या सुटकेसाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू केले. अखेर टीमच्या तीन दिवसांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून अखेर मजुरांची आज सुटका झाली. (Maharashtra News)

धडगाव, अक्कलकुवा, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील रहिवासी असलेल्या ८ उसतोड कामगारांची तीन तुकडी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरवाली येथे गेले होते. त्‍यांना डांबून ठेवलेल्या मजुरांची सुखरूप सुटका होऊन आज टेम्पोने धडगावकडे रवाना झाले आहे. त्यांच्यासह दुसऱ्या मालकाकडे अडकलेल्या ८ मजुरांची देखील सुटका करण्यात आली असून ते देखील या मजुरांसह एकाच वाहनात येत आहे. लहान बालके, महिला आणि पुरूष मिळून एकूण ४२ नागरिकांची सुटका झाली.

उसतोड मजुरांना डांबून ठेवण्याचा प्रकार हा नवीन नसून अनेक वेळा असा अमानुषातेचा प्रकार समोर आला आहे. याबाबतीत प्रशासनाच्यावतीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तालुक्यात रोजगार संधीच्या अभावी मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. त्या ठिकाणी मजुरांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. मजुरावर अमानुष वागणूक देणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुलुंड पोलिसांची मोठी कारवाई! केबल चोरी करणारी आंतरराज्य टोळीला ठोकल्या बेड्या

Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह! भाजपने केसानं गळा कापला, शिंदेसेनेच्या आमदाराचा आरोप

Homemade Skin Tan Removal Tips: उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? पार्लरला जाण्यापूर्वी 'हे' ५ घरगुती उपाय करा; चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Face Care: उन्हामुळे त्वचेची डल पडली आहे? घरी तयार केलेला हा फेस स्क्रब आठवड्यातून ३ वेळा नक्की वापरा

SCROLL FOR NEXT