gujrat police 
महाराष्ट्र

विस्‍तार अधिकारीकडून वाघसदृश्‍य प्राण्याचे कातडे व नखे तस्करी; गुजरात पोलिसांनी केली अटक

विस्‍तार अधिकारीकडून वाघसदृश्‍य प्राण्याचे कातडे व नखे तस्करी; गुजरात पोलिसांनी केली अटक

दिनू गावित

नंदुरबार : वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे व नखे तस्करी करत अन्‍य राज्‍यात नेले जात होते. या प्रकरणी गुजरात सागबारा पोलिसांनी अक्कलकुवा येथील विस्तार अधिकाऱ्याला अटक केली. (nandurbar news Smuggling of tiger animal skins and claws by extension officers Gujarat Police Arrests)

नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यातील अक्‍कलकुआ (Akkalkuwa) पंचायत समितीत विस्‍तार अधिकारी असलेले किशोर अहिरे हे वाघसदृश्‍य वन्य प्राण्यांचे कातडे व नखे महाराष्ट्रातून गुजरातकडे नेत होते. या संशयावरुन विस्तार अधिकारी किशोर अहिरे यांना गुजरात पोलिसांनी (Gujrat Police) अटक केली आहे. तसेच कातडे व नखे ताब्‍यात घेतले आहे.

साडेपंधरा लाखाचा मुद्देमाल जप्‍त

गुजरात (Gujrat) राज्यातील सेलबा-सागबारा येथील धनसेरा येथे वाहनाची तपासणी दरम्यान सागबारा पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. संबंधिताकडून कारसह १५ लाख ५७ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यात फरार असणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर संशयितांवर कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय सेवेतील अधिकाऱयांच्या कारनाम्याने चर्चेला उधान आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT