Leopard Attack On Sleeping woman  SAAM TV
महाराष्ट्र

Nandurbar News: भयंकर! झोपलेल्या महिलेवर बिबट्याच्या हल्ला, घरातून 50 मीटरपर्यंत फरफटत नेलं

Leopard Attack On Sleeping woman: या हल्ल्यात महिलेचे शरीर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सागर निकवाडे, साम टीव्ही

Nandurbar Leopard Attack News: नंदूरबार जिल्ह्यातील नयामाळ गावात बिबट्याने झोपेत असलेल्या महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात महिलेचे शरीर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात रात्री कुडाच्या झोपडीत झोपलेल्या एका महिलेला पहाटेच्या सुमारास बिबट्याने घरातून ओढत नेले. त्यानंतर महिलेचे शिर धडापासून वेगळे करत तिला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण परसरलंय. ही घटना समोर आल्यानंतर वनविभागाने यावर तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील नयामाळ येथे सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचे शिर धडापासून वेगळे झाल्याचे आढळून आले आहे.

या घटनेत बिबट्याने महिलेला घरातून सुमारे ५० मीटर ओढत नेल्याचे समोर आले आहे. ३३ वर्षीय सरिता ऊर्फ सरिला वन्या वसावे असे मयत महिलेचे नाव आहे. ती नयामाळ येथे कुडाच्या झोपडीत रात्री झोपली होती. सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने झोपडीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि महिलेला घरातून बाहेर फडफटत नेले. या दमरम्यान महिलेने आरडाओरड केली. मात्र रात्रीच्या अंधारात घरात काय झाले? याचा कोणालाच अंदाज आला नाही. घडलेला प्रकार लक्षात येईपर्यंत बिबट्याने महिलेला फरफटत नेऊन ठार केले होते. (Marathi Tajya Batmya)

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अक्कलकुवा वनक्षेत्रपाल ललित गवळी यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सरिता यांचे डोके शरीरापासून ३० मीटर अंतरावर आढळून आले असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल यांच्यासह पोलिस नाईक अनिल पाडवी, तुकाराम पावरा यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक केदार अधिक तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

Numerology: या तारखेला जन्मलेली व्यक्ती असते श्रीमंत, राजसारखे आयुष्य जगते

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

SCROLL FOR NEXT