नंदुरबार : परिवहन विभागातर्फे खासगी प्रवासी वाहतूक करत असलेल्या बसची तपासणी मोहिम राबविली जात आहे. मागील बारा दिवसांपासून ही मोहिम राबविली जात असून आतापर्यंत १४३ खासगी बसवर दंडात्मक कारवाई (RTO) आरटीओ विभागाने केली आहे. (Maharashtra News)
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आरटीओ विभागाकडुन (Nandurbar RTO) खाजगी प्रवासी बसेसची तपासणीसाठी विशेष मोहिम 9 ऑक्टोंबर पासून राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहीमेत विना परवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करुन चालणाऱ्या बसेस, अवैधरित्या मालवाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक तसेच अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल इत्यादी बाबींची तपासणी करण्यात येत आहे.
२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल
मोहिमेतंर्गत आतापर्यत 275 बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यात दोषी आढळलेल्या 143 बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. 75 खाजगी बसधारकांकडून 2 लाख 72 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.