Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : तोरणमाळकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

Nandurbar News तोरणमाळकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : धडगाव तालुक्यातील तोरणमाळ, झापी, लेकडा ते राज्य सीमा मार्गापर्यंत १७ कोटीं रुपये खर्च (Nandurbar) करून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्ता पहिल्याच पावसात (Rain) वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. (Live Marathi News)

नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनेक भागात आजही रस्ते झालेले नाही. परंतु प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा माध्यमातून धडगाव तालुक्यातील रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. शिवाय ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून पहिल्याच पावसात रास्ता वाहून गेला आहे. यामुळे रस्ता वाहून गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.  

१२ गावांचा संपर्क तुटला 

पहिल्या पावसात रस्ता वाहून गेला आहे. तर काही भागात रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने तोरणमाळ परिसरातील १० ते १२ गावांच्या संपर्क देखील तुटलेला आहे. प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करत रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT