Nandurbar News Saam Impact
महाराष्ट्र

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

Nandurbar News : नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपुर येथे नेण्यासाठी तब्बल ७ किलोमीटरचे अंतर झोळी करून आणि पायपीट करत पार करावे लागले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी झोळीत टाकून नेण्यात येत होते. याबाबत साम टीव्हीने बातमी दिल्यानंतर बांधकाम विभागाला खडबडून जाग आली असून कर्मचारी घटनास्थळी येत पाहणी केली. यानंतर शहादा तालुक्यातील बुरीमाळ, साबलापाणी, उमरापाणी दुर्गम भागात लवकरच दोन लहान आणि दोन मोठे पूल आणि सहा किलोमीटर पर्यंतचा रस्ता तयार केला जाणार आहे.

नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपुर येथे नेण्यासाठी तब्बल ७ किलोमीटरचे अंतर झोळी करून आणि पायपीट करत पार करावे लागले. रस्ता नसल्यामुळे आणि कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध नसल्याने ही गंभीर परिस्थिती साम टीव्ही प्रसारित केल्यानंतर बांधकाम विभाग आता खडबडून जागा झाला असून साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे.

चार पुलांसह रस्ता होणार तयार 

दरम्यान नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत बुरीमाळ, साबलापाणी, उमरापाणी या गावात आता रस्ता आणि पूल तयार करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये नदीवर दोन मोठे पूल आणि दोन लहान पूल तयार केले जाणार आहेत. त्यासोबतच सहा किलोमीटर पर्यंतचा रस्ता बांधकाम विभागाच्या माध्यमातून तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

जागेचे करण्यात आले मोजमाप 

शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन रस्ता आणि फुल तयार करण्याची जागेचे मोजमाप करण्यात आलेले आहे. लवकरच या भागात रस्ते आणि पूल तयार होणार आहेत. यामुळे इथल्या आरोग्याच्या समस्या आणि दळणवळणाच्या समस्या सुटणार असून साम टीव्हीने दाखवलेले या बातमीनंतर स्थानिक आदिवासी बांधवांकडून साम टीव्हीचे आभार मानण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest Pain: हार्ट अटॅक अन् जळजळ यातला फरक कसा ओळखायचा? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण लक्षणे

Long Sleeves Blouse Design: मॉडर्न अन् स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे 'फुल स्लिव्ह ब्लाऊज'

Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूरस्थिती हिंगणी हवेलीत नऊ नागरिक पाण्यात अडकले

savalyachi janu savali: मेहेंदळे कुटुंबाच्या व्यवसायातून तिलोत्तमा या व्यक्तीला करणार बेदखल? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT