Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: चांदशैली घाटात पिकअप दरीत कोसळली; अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

चांदशैली घाटात पिकअपदरीत कोसळली; अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. नागमोडी वळणाचा आणि तीव्र उताराचा असलेल्या हा चांदसैली घाट असून नागमोडी (Nandurbar) वळणावरून ३ पलटी खात गाडी खोल दरीत कोसळली. यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन गंभीर जखमी आहेत. (Breaking Marathi News)

धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोळणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा (Chandshaili) चांदसैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.

३ मृतदेह काढले बाहेर

नंदुरबार जिल्‍ह्यातील चांदशैली घाट हा तिव्र उतार व वळणाचा असल्‍याने येथे अनेक अपघात होत असतात. यात उतारामुळे वाहन अनियंत्रीत होवून दरीत कोसळले. यात वाहनात असलेल्या ६ जणांपैकी ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृतीही गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू असून तीन जणांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Is waking up at 3 am normal: दररोज पहाटे ३-५ या वेळेत जाग येतेय? सावध व्हा आणि पाहा शरीर तुम्हाला काय संकेत देतंय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

Success Story: वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं! ना कॉलेज, ना कोचिंगशिवाय क्रॅक केल्या १२ सरकारी परीक्षा; IPS संदीप चौधरी यांचा प्रवास

जिमवरून आल्यानंतर काय आणि कधी खाल्लं पाहिजे?

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO

SCROLL FOR NEXT