Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सरपंच निवडणुकीनंतर आता उपसरपंच निवडणूक; कार्यक्रम जाहीर

सरपंच निवडणुकीनंतर आता उपसरपंच निवडणुक; कार्यक्रम जाहीर

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्‍या आहेत. थेट सरपंचाची निवड झाल्यानंतर आता या ग्रामपंचायतसाठी उपसरपंच निवडणुकीचा (Election News) कार्यक्रम जाहीर झाला आहे. ९ ते १३ जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड केली जाणार आहे. (Maharashtra News)

जिल्हा प्रशासनाच्यावतीने (Nandurbar News) यासाठीचे आदेश काढले असून उपसरपंच निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील (Gram Panchayat) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने अनेक गावात सरपंच एका पक्षाचा तर बहुमत दुसऱ्या पक्षाकडे असे चित्र आहे. त्या गावातील उपसरपंच निवडणूक चुरशीच्या होत आहेत.

उपसरपंचाचे उमेदवार सहलीलाही

अनेक ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला असून आपल्या पॅनलमधून निवडून आलेल्या सदस्यांना उपसरपंच निवडणुकीसाठी सहलीलाही पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेते लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीत विमान कोसळलं, वैमानिकाची स्टंटबाजी; स्थानिकांचा आरोप

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली, कारण काय?

Milk Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! अमूल अन् मदर डेअरीचे दूध महागले, नवे दर किती?

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

SCROLL FOR NEXT