Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: दारूच्‍या गोडाऊनवर छापा; ८९ लाखाचा मुद्देमाल जप्त, नवापूर पोलीसांची कारवाई

दारूच्‍या गोडाऊनवर छापा; ८९ लाखाचा मुद्देमाल जप्त, नवापूर पोलीसांची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील गणेश हिल भागात रविवारी मध्यरात्री अवैध दारूचे गोडाऊन विशेष पोलीस महानिरीक्षक व (Navapur) नवापूर पोलीसांनी उध्वस्त केले. या कारवाईत एकूण ८९ लाखाचा अवैध दारू साठा जप्त करण्यात (Nandurbar News) आला आहे. तर १७ आरोपींची धरपकड करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

गुजरात राज्यांमध्ये दारूबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्ह्यातून दारूचा सप्लाय करण्यात येतो. नवापूर शहर दारूचे आगार बनले असून दारूबंदी करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक पथक आणि नवापूर पोलिसांनी दारूचे गोडाऊन उध्वस्त केले असले तरी इतर दारू तस्करांची धरपकड करून दारूचे तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे.

वाहनांसह रोकड जप्‍त

पोलिसांच्‍या कारवाईत ९ मोटरसायकल १७ चारचाकी वाहने, पाच लाख ७० हजार रूपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आले आहे. तसेच २ लाख ७८ हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सतरा वाहनांपैकी १५ वाहनांची सीट ही दारू तस्करीसाठी काढण्यात आलेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT