Crocodile Attacks Youth Bathing in Narmada River Saam TV News
महाराष्ट्र

Nandurbar: नदीत आंघोळीला उतरला, मगरीनं पायाचा लचकाच तोडला; नंदूरबारमध्ये खळबळ

Narmada River Turns Dangerous: नर्मदा नदीत अंघोळ करत असताना मगरीने अचानक हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी; भरड गावाजवळील धक्कादायक घटना.

Bhagyashree Kamble

नर्मदा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तरुणावर मगरीने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा तरूण नंदूरबारच्या अक्राणी तालुक्यातील भरड गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून नदीपात्राजवळ सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कमलेश पावरा असे गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो अक्राणी तालुक्यातील भरड गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. कमलेश नेहमीप्रमाणे नर्मदा नदीत आंघोळ करण्यासाठी गेला होता. पावसामुळे नदी पात्रात वाढ झाली होती. त्यामुळे नदीत मगरींचा वावर वाढला होता. नदीत पोहत असताना त्याच्याजवळ अचानक मगर आली.

मगरीने तरूणावर प्राणघातक हल्ला केला. त्याने कसंबसं स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तो नदी काठावर आला त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात नेले. मगरीने केलेल्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मगरीने तरूणाच्या पायाचा लचकाच तोडला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या पावसाळा सुरू आहे. संततधार पावसामुळे नर्मदा नदीपात्रातही वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मगरींचा वावरही वाढला आहे. दरम्यान, यामुळे अशा घटनांची अधिक शक्यता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वीही याच परिसरात मगरीच्या हल्ल्यात एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून नदीपात्राजवळ सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाकडून विविध संत महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन

भीषण! भरधाव डंपरनं गर्भवतीला चिरडलं; अर्भक रस्त्यावर पडलं, महिलेचा दुर्देवी मृत्यू

Maharashtra Tourism: खंडाळा-लोणावळाही पडेल फिकं, कोल्हापूरमधील 'या' हिल स्टेशनला भेट द्याच

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी खेळी; जितेंद्र आव्हाड यांचा कट्टर समर्थक फोडला

Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? अजित पवारांचे महत्वाचे विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT