महाराष्ट्र

नंदुरबारकारांची पाणी कपात; दसऱ्यानंतर दोन दिवसाआड़ पाणी

नंदुरबारकारांची पाणी कपात; दसऱ्यानंतर दोन दिवसाआड़ पाणी

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार शहराला दसऱ्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने घेतला आहे. (nandurbar-news-nagarpalika-decission-water-supply-on-two-days-in-dasara)

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचेक धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नंदुरबारकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कमी पावसाचा परिणाम

नंदुरबार जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे अनेक लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नंदुरबार नगरपरिषदेने दसऱ्यानंतर 15 ऑक्टोबरपासून नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे. नंदुरबार शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त वापर कमी करून पाणीबचत करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही.

पाण्याचे नियोजन

जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे लघु मध्यम प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यावर व शेती सिंचनावर मोठा परिणाम होणार असून प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असून नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याची काळाची गरज आहे. अन्यथा पाणीबाणी संकटाला सामोरे जावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

Maharashtra Police: पोलिस अधिकाऱ्याने खाकी वर्दीत आयुष्य संपवलं, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; पोलिस दलात खळबळ

Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

Political News : राजकारणात खळबळ! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही केली जाहीर

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू

SCROLL FOR NEXT