सम्राट महाजन
तळोदा (नंदुरबार) : 'खाली पहा, पीक पायाखाली यायला नको' अशी काळजीची सूचना तसेच शेतकऱ्याच्या लहान मुलाला जवळ घेत त्याची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी व सभास्थळी पोहचताच पुढाऱ्यांना नाही; तर पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना स्टेजवर बोलविण्याची दृष्टी. यातून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संवेदनशील मनाचे आणि सर्वसामान्य जनतेचे, शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले ते एक असामान्य शेतकरी 'नेते' असल्याचा अनुभव कालच्या दौऱ्या दरम्यान उपस्थितांना आले. (nandurbar-news-minister-dada-bhuse-tour-taloda-taluka-farmer-sanvad)
बोरद (ता. तळोदा) येथे शनिवारी शेतकरी मिलिंद पाटील यांचा शेतात शेतकरी सुसंवाद सभा व पीक पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या संपूर्ण दौऱ्या दरम्यान कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अंगी असलेल्या जन्मजात शेतकऱ्याचे व विविध गुणांचा अनुभव सर्वांना आला. मिलिंद पाटील या शेतकऱ्याने त्याचा क्षेत्रात लावलेल्या पेरू, लिंबू, तोंडली, पपई, शेवगा पिकांची पाहणी कृषिमंत्री दादा भुसे करीत होते. या दरम्यान पिकांची पाहणी करताना, 'खाली पहा, पीक पायाखाली यायला नको' अशी सूचना वजा विनंती कृषिमंत्री दादा भुसे यांनी तेथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना केली आणि एकप्रकारे पीक पायाखाली तुडवले जाऊ नये म्हणून काळजी घेतली. त्यामुळे उपस्थित सर्वांनाच त्यांच्या या काळजीचे कौतुक वाटले व कृषिमंत्री दादा भुसे फक्त आक्रमकच नाही, तर किती संवेदनशील आहेत हे सर्वांना दिसून आले.
शेतकऱ्यांना स्टेजवर स्थान
इतकेच नाही तर सभास्थळी येत असताना वाटेत शेतकरी मिलिंद पाटील यांचा लहान मुलगा त्यांना दिसला, त्यांनी त्वरित त्याला बोलवले व प्रेमाने जवळ घेत त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच सभास्थळी पोहचल्यावर सर्वप्रथम दादा भुसे यांनी पीक स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना स्टेजवर बोलविण्याचा व पुढारी, अधिकाऱ्यांना नाही तर या शेतकऱ्यांना पुढे स्टेजवर बसविण्याचा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. त्यामुळे मोठा मंत्री झाल्यावर देखील स्वतः शेतकरी कुटुंबातून पुढे आल्याने अजूनही शेतकरी त्यांची अंगी आहे. त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांची चिंता आहे याचा अनुभव सर्वांना आला. त्यामुळे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या या स्वभाव गुणांचीच चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
'सकाळ'ने उजेडात आणलेल्या शेताला भेट
ज्या शेतात कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट दिली व तेथील विविध पिकांची पाहणी केली. त्याच शेताचे मालक मिलिंद पाटील यांच्या नाविन्यपूर्ण यशस्वी प्रयोगाला 'बोरदला थाई पिंक पेरूचे यशस्वी उत्पादन' या मथळ्याखाली 'सकाळ'ने गतवर्षी २० नोव्हेंबरला प्रसिद्धी दिली होती. त्याच शेतात येत कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी मिलिंद पाटील यांच्या इच्छाशक्ती व मेहनतीचे कौतुक केले व इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.