Nandurbar News  Saam Digital
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारमधील खांडबारा सब स्टेशनला भीषण आग; 80 गावाचा वीज पुरवठा खंडित

Nandurbar Sub Station Fire News : नंदुरबारमधील खांडबारा सब स्टेशनला भीषण आग लागली असून 80 गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Sandeep Gawade

नंदुरबारमधील खांडबारा सब स्टेशनला भीषण आग लागली असून परिसरातील 80 गावाचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अटोक्यात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणामुळे संपूर्ण स्टेशन आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. दोन किलोमीटरवरून आगीचे लोळ दिसून येत होते. स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल, मात्र तोपर्यंत सब स्टेशनचं मोठं नुकसान झालं होतं. जुन्या मीटर ढिगार्‍यात शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुण्यामध्ये पुढचे ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

राज्यातली अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस जायचे नाव घेत नाहीये. अशामध्ये पुणे शहरात (Pune City) पुढील तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

परभणीत भिंत कोसळून एकाचा मृत्यू

परभणी शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात शहरातील काद्राबाद प्लाट येथे राहणाऱ्या ४७ वर्षीय शेरखान यांच्या अंगावर शेजारील घराची भिंत कोळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शेरखान यांची पत्नी देखील जखमी झाली आहे. मयत हा कुटुंबातील कमवता एकमेव सदस्य असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी कुटुंबातील सदस्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT