वीजचोरी  
महाराष्ट्र

वीजचोरी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल

वीजचोरी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल

Rajesh Sonwane

नंदुरबार : वीज वितरण कंपनीचा भरारी पथकाने जिल्ह्यातील थकबाकीदारांकडील वसुलीसोबतच अनधिकृतरीत्या आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या नंदुरबार तालुक्यातील ८ जणांविरुद्ध कारवाई करून पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. या आठ जणांनी ८५ हजार रुपयांची वीज चोरी केल्यााचे उघड झाले आहे. (nandurbar-news-mahavitaran-Charges-filed-against-eight-persons-for-stealing-electricity)

जळगाव परिमंडळात सुमारे ९ लाख ९६ हजार १७२ ग्राहकांकडे १ हजार ३४१ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. जळगाव जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार ५७६ ग्राहकांकडे ६३० कोटी ३१ लाख, धुळे जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७५६ ग्राहकांकडे ३८६ कोटी ८० लाख तर नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ८४० ग्राहकांकडे ३२४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यासाठी ५०० रुपयांहून अधिक बील असलेल्या सर्व ग्राहकांना वीज मंडळाने धारेवर धरले आहे. बिनधास्त आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांवरही आता अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

यांच्‍यावर गुन्‍हे दाखल

नंदुरबार तालुक्यातील होळ आणि भोणे शिवारात आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. नंदुरबार शहर आणि उपनगर या दोन्ही पोलिसठाण्यात याविषयी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांची नावे याप्रमाणे- महेंद्र प्रभाकर पाटील, रा. होळ तर्फे हवेली (४ हजार १७० रु.), कैलास सुदाम पाटील, रा. प्लॉट क्र.४०, वाघोदा शिवार, (४ हजार ३१० रु.), रवींद्र सोनू जगताप, रा. होळ तर्फे हवेली शिवार (१२ हजार ४३० रु.), नितीन सोनू जगताप, रा. होळ शिवार (२ हजार ९४४ रु.), भालचंद्र ताराचंद मराठे, रा.भोणे (१३ हजार १७० रु.), विनोद ब्रिजलाल मोरे, रा.भोणे (१९ हजार २६० रु.), माधू धोंडू मराठे, रा.भोणे (२८ हजार ८९० रु.). अशी एकूण ८५ हजार रुपयांची वीज बील आकारणी करण्यात आली असून या आठही जणांविरुद्ध महावितरणचे ग्रामीण सहायक अभियंता राजीव रंजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज चोरी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT