Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: विहिरीतून गाळ काढताना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू

विहिरीतून गाळ काढताना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : मांजरे (ता. नंदुरबार) शिवारातील शेतात विहिरीतून गाळ काढताना क्रेनमध्ये भरलेल्या (Nandurbar) मलिदामधील दगड विहिरीत काम करणाऱ्या मजुराच्या डोक्यात पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत क्रेनचालकाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Live Marathi News)

मांजरे (ता. नंदुरबार) शिवारातील शेतकऱ्याचा (Farmer) शेतातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम क्रेनचालक छोटूलाल चंद्राजी रेगर यास दिले होते. तो व त्याचा भाऊ मदन चंद्राजी रेगर (वय ३५, रा. राजस्थान) यांच्यासह काम करत होते. छोटूलाल क्रेन चालवीत होता. मदन विहिरीत असलेला मलिदा क्रेनमध्ये भरून देण्याचे काम करत होता.

क्रेन हलली अन्‌

मलिदा व दगड भरून क्रेन विहिरीतून वरती येत असताना ती हलली. त्यामुळे क्रेनमधील दगड मदनच्या डोक्यावर पडला. त्यात तो गंभर जखमी होऊन मृत्यू झाला. याबाबत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात छोटूलाल चंद्राजी रेगर याच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT