Crime Saam tv
महाराष्ट्र

चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात

चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : जिल्ह्यात शटर उचकवून दुकानांमधील चोऱ्या, मोटारसायकल चोरीचे गुन्हे वाढले होते. त्या गुन्ह्यांच्‍या तपासाची धुरा एलसीबीकडे सोपविण्यात आल्यानंतर काही दिवसातच मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) जिल्ह्यात चोरीची धुडगुस घालणारी टोळीचा तपास लावून त्यांचा गावात जाऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात तिघांना अटक करून त्यांचाकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यासोबतच त्यांनी विविध प्रकारच्या १५ चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. (nandurbar news Interstate robbery gang in police custody)

जिल्ह्यातील शहादा, सारंगखेडा व म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत दुकानांचे शटर उचकावून चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली होती. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासाचे सुत्रे दिली. त्यांनी चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, त्‍यांची इत्थंभूत माहिती घेवून रेकॉर्डवरील मालमत्तेविरुध्दच्या (Nandurbar News) गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवली. ३ मेस सकाळी साडेपाचला मंदाणा (ता. शहादा) येथून मोटारसायकल, कापड दुकानातील व मेडीकलमधील कपडे, रोकड, एका घरातील रोकड, सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल चोरीची घटना घडली. अमोल शालीग्राम साळुंखे यांनी शहादा पोलीसात (Police) फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेशांतर करत पोलिसांची पायपीट

१७ मेस पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की शहादा, म्हसावद व सारंगखेडा परीसरातील दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी ही बडवानी जिल्ह्यातील कालाखेत व धार जिल्ह्यातील डोंगराळ भागातील आहे. एलसीबीला ही माहिती दिली. तात्काळ एक पथक तयार करुन पथक मध्यप्रदेश येथे गेले. पथकाने पाटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोकराटा, आमली, कालाखेत, गोलपाटीबैडी आदी गावांच्या पाड्या पाड्यांवर स्थानिक पोलीसांच्या मदतीने जावून ३ ते ४ दिवस मुक्काम केला. वेषांतर करून फिरले. १६ कि.मी. पायपीट करीत न्हावड्या फळी, बोकराटा येथील संशयीतांच्या घरी अचानक छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले. त्यात तुकाराम मास्तरीया वास्कले (वय २४), संना रामसिंग वास्कले (वय ४४), समदर रामसिंग वास्कले (सर्व रा . मु . न्हावड्या फळी) यांचा समावेश आहे.

गुन्‍ह्याची कबुली

तुकाराम वास्कले याचे वडील बडवानी जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांना संना व समदार यांची ओळख मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील नवलसिंग, धरमसिंग, नोरद्या, रायसिंग यांच्याशी झाली. कालांतराने तुकाराम वास्कले यांचे वडील शिक्षा पूर्ण भोगून घरी आल्यानंतर हे समदर वास्कले यांच्या मदतीने मागील ९ ते १० महिन्यात त्यांनी शहादा, म्हसावद, सारंगखेडा हद्दीतील छोट्या छोट्या गावांमध्ये शटर उचकावून चोरी व मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT