Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून आर्थिक लूट; गणवेश खरेदीसाठी एकाच दुकानाचे नाव

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शाळा सुरु झाल्या असून आता पालकांकडून मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश खरेदीची लगबग सुरु आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर येत आहे. अन्य दुकानांमध्ये कमी दारात गणवेश मिळत असताना एका विशिष्ट दुकानातूनच गणवेश खरेदीचे सांगितले जात आहे. 

शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने आता पालकांकडून मुलांसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. नंदुरबार शहरातील विविध नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेण्यासाठी एकाच दुकानातून गणवेश खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांची लूट होत आहे. अन्य दुकानांवर कमी दरात गणवेश उपलब्ध (School) असताना देखील जास्त दराने गणवेश खरेदी करून पालकांची आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

शिवसेनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन 

या सदर प्रकाराबाबत शिवसेना उबाठा पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. खाजगी शाळांकडून होत असलेल्या या प्रकाराबाबत कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT