महाराष्ट्र

नंदुरबारला ध्वजारोहण उत्साहात; उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान

नंदुरबारला ध्वजारोहण उत्साहात; उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान

दिनू गावित

नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार ऍड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते नंदुरबारमधील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. (Nandurbar-news-independance-day-celebereat-collector-office)

कोव्हीडच्या पार्श्वभुमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सुरवातील पोलीस दलाकडुन मानवंदना देण्यात आली. यानंतर सामुहीक राष्ट्रगाणानंतर स्वांतंत्र दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संप्पन झाले. नंदुरबार जिल्ह्यातील कमी पर्जनमान्य ध्यानात घेता आगामी काळात शासन शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असेल असा विश्वास यावेळी मंत्री के.सी पाडवी यांनी व्यक्त केला. तर जिल्ह्यातील कुपोषण निर्मुलनासाठी आगामी काळात विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले. यानंतर त्यांच्या हस्ते महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱया संस्था व्यक्तिना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोबतच कोव्हीड काळात महात्मा फुले जीवनादायी योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील तीन खाजगी रुग्णालयांचा सन्मान देखील यांवेळी करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मनिषा खत्री, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल आदिंसह पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT