आयान साखर 
महाराष्ट्र

Nandurbar : आयान साखर कारखान्‍यात दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरूच

आयान साखर कारखान्‍यात दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरूच

दिनू गावित

नंदुरबार : आयान मल्ट्रीट्रेंड प्रा. लिमिटेड साखर कारखान्यावर दुसऱ्या दिवशी ही आयकर विभागाच्या वतीने तपासणी सुरूच आहे. आयकर विभागाची कारवाई सुरू असल्‍याने आज सकाळपासूनच कारखान्याच्या आवारात सीआरपीएफचे जवान तैनात आहेत. (nandurbar-news-income-tax-raid-The-inspection-at-Ayan-Sugar-Factory-continued-for-another-day)

नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथे स्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर कालपासून आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. गुरूवारी बारा तासांच्या चौकशीनंतर सूत्रांच्या माहितीनुसार आज सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई सुरूच राहणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत कारवाईनंतर दहा वाजता अधिकारी कारखान्याच्या बाहेर पडल्याची सूत्रांची माहिती आहे.

सीआरपीएफचे जवान तैनात

आज सकाळपासूनच कारखान्याच्या आवारात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून कामगारांव्यतिरिक्त कोणालाही आत मध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कारखान्याच्या तपासणी साठी किती वेळ लागेल, नेमकी काय कारवाई सुरू आहे याबाबत अस्पष्टता आहे. तसेच याबाबत कारखाना प्रशासनाच्यावतीने अजूनही कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT