Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: साडेपाच लाखाचा अवैध दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

साडेपाच लाखाचा अवैध दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

दिनू गावित

नंदुरबार : शहादा तालुक्यातील जावदा त.ह. ते भमराटा नाका दरम्यान अवैध दारू वाहतूक करणारी वाहन म्हसावद पोलिसांनी (Police) जप्त केली. त्यात सुमारे साडेपाच लाखाचा अवैध दारूसह वाहन जप्त करण्यात आले. (Live Marathi News)

शहादा (Shahada), वडगाव, जावदामार्गे मध्य प्रदेशकडे (Madhya Pradesh) जाणाऱ्या भमराटा नाकाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती म्हसावद पोलिसाना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ सापळा रचून (Nandurbar News) जावदा त.ह. गावातील गावठाणच्या मोकळी जागेवर अवैध दारू वाहतूक करणारी पिकअप वाहन थांबवुन तपासणी केली. त्यात सुमारे दोनशे बियरचे बॉक्स आढळून आले. त्याची किंमत पाच लाख २८ हजार मिळून आली.

चालकही ताब्‍यात

म्हसावद पोलीस ठाण्यात वाहन त्याची किंमत सुमारे पाच लाख असा एकूण दहा लाख २८ हजार किंमतीचा माल जप्त करण्यात आला. दारूची वाहतूक करणारा कोमलसिंग तारसिंग भील (रा. पळासनेर ता. शिरपूर) याला अटक करण्यात आली असून ही कारवाई म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, घनश्याम सुर्यवंशी, अजित गावित राकेश पावरा, उमेश पावरा यांनी केली पुढील तपास पोलीस करीत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला भेट देणार

Kapil Sharma Cafe Firing Case: कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणारा 'रॉकेट' फ्रान्समध्ये अटक; लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा धक्का

मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; देशाच्या राजकारणात शोककळा

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

SCROLL FOR NEXT