Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: पती– पत्‍नी बाहेर अन्‌ मुले होती घरात; अचानक आग लागल्‍याने घर जळून खाक

पती– पत्‍नी बाहेर अन्‌ मुले होती घरात; अचानक आग लागल्‍याने घर जळून खाक

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : धडगांव तालुक्यातील खुटांमोडीचा पितीपाडा येथे नरपत इरमा वळवी यांच्या घराला अचानक आग (Fire) लागली. त्यात संपुर्ण घर जळून राख झाले आहे. (Breaking Marathi News)

घराला आग लागल्याने आरडाओरड करीत तोपर्यंत उंचावर हवेशीर घर असल्याने हवेच्या जोराने घर काही वेळेतच घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्यसाठा तसेच बचतगटाच्या सौर उर्जेच्या मिळालेले चार पत्रेही जळुन गेले. घराला (Nandurbar News) असलेल्या सागाच्या खांब माळाचे लाकुडसह संपुर्ण घर जळुन गेल्याने कुटुंब उघड्यावर आले. आग विझविण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यात लाखोंचे नुकसान झाले.

मुले थोडक्‍यात बचावली

नरपत वळवी हे घराच्या जवळील शेतात आंब्याचा झाडांसाठी कुंपण बनवित होता. त्यांची पत्नी गावातच नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी घरात दोन मुले खेळत होती. त्यावेळेस घराला आग लागल्याने मुले घराबाहेर पळून गेल्याने ते वाचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

SCROLL FOR NEXT