Nandurbar News Marriage Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: हौसेला मोल नाही; लग्न लावण्यापूर्वी नव वर– वधूला हेलिकॉप्टरची सफर

हौसेला मोल नाही; लग्न लावण्यापूर्वी नव वर– वधूला हेलिकॉप्टरची सफर

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : 'हौसेला मोल नसते' अशी म्हण आहे. कोण कशाची हौस करेल याचं सांगता येत नाही. अशीच एक हौस नवरदेवाच्या पित्याने केली असून हा नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. लग्न (Marriage) लागण्यापूर्वी नवरदेव पित्याने आपला वर मुलगा व वधू सूनबाई यांना शहरातून हेलिकॉप्टरने सफर घडवली. (Breaking Marathi News)

नंदुरबार शहरातील राजपूत समाजाध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांचा मुलगा हंसराज याचा विवाह सोहळा जैनाबाद (ता.जि बऱ्हाणपूर, म.प्र) येथील विजयसिंग राजपूत यांची कन्या रितिका हिच्याशी मंगळवारी गोरज मुहूर्तावर पार पडला. तत्पूर्वी नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांनी हौसे खातर नवरदेव मुलगा हंसराज व नववधू सुनबाई रितिका हिला शहरातून हेलिकॉप्टरने सफर घडवून आणली.

त्‍यावेळी हत्तीवरून वाटली साखर

नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांना लग्नानंतर तब्बल ३८ वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाला. पुत्ररत्नाच्या आनंदाने त्यावेळी त्यांनी श्रीक्षेत्र शेगावहून हत्ती मागवत त्या हत्तीवरून नंदुरबारात नातेवाईक, मित्र मंडळ व आप्तेष्टांना साखर वाटप केल्याचे नवरदेव पिता मोहिनिराज राजपूत सांगतात.

अन् मनात आला हेलिकॉप्टरच्या विचार

नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांना ३८ वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाला होता. त्याच वेळी त्यांनी मुलाचा लग्न सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचे ठरवले होते. मोहिनीराज राजपूत यांनी अनेक लग्न समारंभांना हजेरी लावली. अनेक लग्न समारंभामध्ये भव्य दिव्य आरास, स्टेज, शाही विवाह पाहिले. परंतु, यापेक्षाही मुलगा हंसराज याच्या विवाह अनेकांच्या स्मरणात राहील असे करून दाखवण्याचा निर्धार केला. अन् मुलाचं लग्न लागण्यापूर्वी नवदांपत्यास शहरातून हेलिकॉप्टरची सफर घडवून आणण्याच्या चंग बांधला. त्यानुसार, आजच्‍या गोरज मुहूर्तावर लग्न लागण्याच्यापूर्वी दुपारी हेलिकॉप्टरमधून नवदांपत्यास सफर घडवून आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT