Nandurbar Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा कहर; पुराच्या पाण्यात तीनजण गेले वाहून, ४२ घरांची पडझड

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात तीन- चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील केले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजविला असून पावसामुळे नदी, नाल्यांना मोठे पूर आले आहेत. दरम्यान पावसामुले आलेल्या पुराच्या पाण्यात तब्बल तीन जण वाहून गेल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. यात एका आश्रम शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात तीन- चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील केले आहे. (Nandurbar Rain) जिल्ह्यातील ४२ घरांची पडझड झाली आहे. दरम्यान अक्कलकुवा तालुक्यात दोन तर अक्राणी तालुक्यात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. यात अक्राणी तालुक्यातील माळचा गेंदा येथील बायसिंग बहादुर पावरा (वय ३६) हे पुरात वाहुन मृत झाले आहेत. तर (Akkalkuwa) अक्कलकुवा तालुक्यातील गुलींअंबरचे रहिवाशी असलेले संतोष रमेश वसावे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. 

दुचाकीसह शिक्षक गेले वाहून 

तसेच अक्कलकुवा तालुक्यातीलच दुर्गम भागातील बर्डी येथील शासकीय आश्रम शाळेत रोजंदारी शिक्षक असलेले ईश्वर रामा वसावे (रा. गमन) हे रोयाबारीपाडा येथील दुकानावरून घरी परत जात होते. रस्त्यातील नदी ओलांडत असताना ते वाहून गेल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. त्यांच्या मृतदेह आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आढळून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातपुड्याच्या दुर्गम भागात पोळा सणाचा उत्सव

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT