Nandurbar Temperature Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Temperature : नंदुरबार जिल्ह्यात अलर्ट जारी; तापमान ४३ अंशाच्यावर

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वरती गेले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन देखील हाय अलर्ट

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे. पॅरा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांच्या जनजीवनावर होतानाचा पाहायला मिळत आहेत. दरम्यान वाढत्या तापमानामुळे नंदुरबार जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

राज्यात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तापमान ४२ अंशाच्या वर कायम आहे. आता नंदुरबार जिल्ह्यात देखील पारा वाढतच आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वरती गेले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन देखील हाय अलर्टवर आले आहे.

उन्हाचा फळ पिकांना फटका 
वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे उन्हाचा वाढत्या तीव्रतेमुळे तालुक्यातील आंबा आणि काजू फळ पिकाला फटका बसला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे काजू झाडावर फळ पिके सुकून गेले आहेत. त्यामुळे फळ पिके गळून पडले आहेत. काजू आणि आंबा शेतकरी अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

प्रशासन हाय अलर्ट
तापमानाचा त्रास होऊन उष्माघाताचा त्रास जाणविण्याची शक्यता वाढली आहे. या वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवल्यास उष्माघात कक्षात उपचार घ्यावेत; असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Kangana Ranaut: कंगना रनौतच्या उलट्या बोंबा सुरूच; राखी सावंतची कंगनाला चोपण्याची भाषा

Thursday Horoscope : वाद-विवादापासून लांब राहा, ८ राशींवर स्वामींची कृपा राहणार; वाचा आजचे राशीभविष्य

Jarange Patil: 'एकतर मी जाईन, नाहीतर सरकार...'; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, 29 ऑगस्टला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

Maharashtra Potholes: खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; महानगरांमध्ये रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

SCROLL FOR NEXT